ताज्या बातम्या
भगवान महाजन यांचा भाजपा मध्ये असंख्य कार्यकर्तेसह प्रवेश

प्रतिनिधी विनोद रोकडे
भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन, एरंडोल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ बुधा महाजन, उपजिल्हा संघटक राजेंद्र दोधू चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यकारी अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा गिरीष महाजन ,प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी, आ. श्री. मंगेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.