ताज्या बातम्या
भवरखेडे विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
धरणगाव (प्रतिनिधी)अजय बाविस्कर
धरणगाव – येथील भवरखेडे तालुका धरणगाव येथे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,सोनल पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना विद्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सोनल पाटील यांनी महात्मा गांधी यांचे कार्य व त्यांची तत्वे याविषयी माहिती सांगितली.तसेच विद्यालयातील शिक्षक समाधान पाटील यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती सांगितली. यावेळी शिक्षक पंकज ठाकरे,राजेश ठाकरे,स्वप्निल पवार,सुनील लोहार,समाधान पाटील, सविता पाटील,अनिता पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.