ताज्या बातम्या
भाजपच्या रावेर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती

प्रतिनिधी – उमेश कोळी
रावेर – भाजप च्या लोकसभा निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे केली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमात एका पत्राद्वारे दिली आहे. नंदकिशोर महाजन हे मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते रावेर तालुक्यातील वजनदार व्यक्तीमत्व असून रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. नंदकिशोर महाजन यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातुन जास्तीत जास्त जागा भाजपाच्या निवडुन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे.
