भाजपा जळगाव सोशल मिडिया मेळावा माजी कृषी मंत्री कर्नाटक श्री.अरविंद लिंबावली व प्रदेश सोशल मिडिया संयोजक श्री.प्रकाश गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
प्रतिनिधी – उमेश कोळी
जळगांव – देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून, या निमत्ताने देशभरात भाजपा मार्फत मोदी@9 “महाजनसंपर्क अभियान” सुरू आहे. या अनुषंगाने आज भाजपा जळगांवची “सोशल मीडिया कार्यशाळा व मेळावा” चे ब्राह्मण सभा, बळीराम पेठ जळगाव येथे माजी कृषी मंत्री कर्नाटक श्री.अरविंद लिंबावली व प्रदेश सोशल मिडिया संयोजक श्री.प्रकाश गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष आ.श्री.सुरेश भोळे यांच्यासह खा. रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील सोशल मिडिया पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी कृषी मंत्री कर्नाटक श्री.अरविंद लिंबावली, जिल्हाध्यक्ष आ.श्री.सुरेश भोळे, प्रदेश सोशल मिडिया संयोजक श्री.प्रकाश गाढे, खा. रक्षाताई खडसे खा. उन्मेष पाटील, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.दिपक सूर्यवंशी, उ.म.सो.मिडिया प्रभारी श्री.दिपक जगताप, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती स्मिताताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष श्री. अशोक कांडेलकर, प्रदेश चिटणीस श्री.अजय भोळे, आमदार श्री.संजय सावकारे, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस श्री.मधुकर काटे, महिला मोर्चा जिल्ह्याध्य्क्ष सौ.रेखाताई पाटील, ह.भ.प श्री.जळकेकर महाराज, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद पाटील, श्री.पद्माकर महाजन, जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्री.गणेश माळी, जिल्हा सोशल मिडिया सहसंयोजक श्री.भरत सोनगिरे, जळगाव लोकसभा सो.मि. संयोजक श्री.अक्षय चौधरी, रावेर लोकसभा सो.मि.संयोजक श्री.पंकज भारंबे, आत्मनिर्भर भारत योजना जि.सहसंयोजक श्री.मिलिंद वाणी, भाजयुमो जिल्हा सहसंयोजक श्री.हेमंत देवरे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री.सचिन पवार, सर्व भाजपा तालुकाध्यक्ष, प्रमुख तालुका पदाधिकारी उपस्थित होते.