भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव..
धरणगाव – डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील यांची नुकतीच युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या जळगाव जिल्हा युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीत डॉ. हेडगेवार नगरचे उपसरपंच चंदन पाटील यांची युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजपतर्फे कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नुकतेच जळगाव जिल्हा शिवसेना परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जळगाव जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, नगरसेवक विजय महाजन, नगरसेवक पप्पू भावे, तालुकाप्रमुख संजय चौधरी, भाजप जिल्हा मीडिया प्रमुख टोनी महाजन, छोटू जाधव, शिवदास पाटील, रवींद्र कंखरे, वाल्मीक पाटील, मधुकर महाजन, योगेश पी.पाटील, पवन महाजन, नगरसेवक नंदकिशोर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.