भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठची जळगाव महानगर व ग्रामीणची कार्यकारिणीची आढ़ावा बैठक संप्पन
जळगाव प्रतिनिधि उमेश कोळी
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.जागतिकी करणामुळे शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्या तरी तरुणांपुढे पदवीधरांपुढे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. उच्च शिक्षण, नोकरी, बेरोजगारी, व्यवसाय, स्पर्धा परीक्षा अशा एक न अनेक समस्यांनी पदवीधर भेडसावून गेले आहेत. या समस्या समजून घेऊन त्या प्रभावीपणे सोडविता याव्यात यासाठी भारतीय जनता पक्षाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार “भाजपा पदवीधर प्रकोष्ठची ” स्थापना करण्यात आली.आज दि. ५/८/२०२३ रोजी, भा.ज.पा पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रदेश संयोजक माननीय श्री.धनराजजी विसपूते सर यांच्या अध्यक्षतेखाली व सौ.जाईताई जगताप, जळगाव जिल्हा समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदवीधर प्रकोष्ठ जळगाव महानगर व जळगाव जिल्हा ग्रामीणची आढ़ावा बैठक जळगाव येथील भाजपा जिल्हा कार्यालय वसंत-स्मृती येथे संप्पन झाली. त्यात विसपूते सरांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले व पदवीधर प्रकोष्ठ म्हणजे काय व त्यात करावयाची कामे व उणीवा, अडचण असे सगळ्यां गोष्टी बाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सौ.जाईताई जगताप यांनी सुद्धा सगळ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. तत्पुर्वी पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक मा.श्री.धनराजजी विसपूते सरांनी जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा जळगाव महानगरच्या जिल्हाध्यक्षा सौ.उज्ज्वलाताई बेंडाळे आणि जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी भाजपा पदवीधर प्रकोष्ठ चे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. बाविस्कर, स्वप्निलभाऊ मोरे, जळगाव जिल्हा ग्रामीणच्या संयोजीका अॅड.कृतिकाताई आफ्रे मॅडम, जिल्हा सहसंयोजक रोहित अग्रवाल, प्रसाद पाटील, उमेश कोळी, निखिल घोड़ेस्वार, स्वप्निल पाटील, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, चित्रलेखा मालपाणी, हिना ढालवाले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी जिल्हा संयोजिका अॅड कृतिकाताई आफ्रे यांनी आभार व्यक्त केले.