ताज्या बातम्या

भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी उमेश कोळी

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विषयक महत्वपूर्ण विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे मंत्रालयाने भुसावळ मंडळ अंतर्गत प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पाच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला, भुसावळ मंडळ अंतर्गत असलेल्या रेल्वे गेट जवळील नव्याने बनविण्यात येणाऱ्या पुलांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, भुसावळ स्टेशन येथे पेंडिंग असलेल्या विविध विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला, रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध प्रवासी संघटना, व्यापारी संघटना यांच्याकडून आलेल्या विविध मागण्याविषयी चर्चा केली तसेच रेल्वेच्या इतर कामांचा खा. रक्षाताई खडसे यांनी आढावा घेऊन, सदर कामे तत्काळ मार्गी लावणे संबधी रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच आपल्या स्तरावरून रेल्वे मंत्रालयास कोणकोणत्या बाबींचा पाठपुरावा करावा याबाबत विचारणा केली.यावेळी एडीआरएम श्री.सुनिल कुमार सुमन, सिनियर डीसीएम श्री.धिरेंद्र सिंह, बीसीएम श्री.अनिल पाठक, सिनियर डीओएम श्री.मीना, सिनियर डीईएन श्री.पंकज धावरे, सिनियर डीईएन (नॉर्थ) श्री.निशित मल, डीआरयुसीसी मेंबर श्री.अनिरुद्ध कुलकर्णी, श्री.गोविंद अग्रवाल, श्री.मधुकर राणे, श्री.अनिल खंडेलवाल, पहूर सरपंच श्री.रामेश्वर पाटील, प्रवासी संघटना अध्यक्ष श्री.बिहारी आहुजा, श्री.विजय पालवे, श्री.गोपाळ व्यास, श्री.चंद्रकांत मुथा, श्री.विकास कोटेचा, श्री.निलेश थोरात, मुख्याधिकरी श्री.साजिद पिंजारी, श्री.अरुण पांडव, श्री.सारिका ताई डागा, श्री.स्वप्नील झांबड, श्री.संदीप इंगळे, श्री.विश्वनाथ कासार, श्री.अरविंद कीनगे, श्री.महेंद्र बुरड, श्री.रुपेश शृष्रीमन, श्री.तजय अग्रवाल ई. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *