भोद बु., खु. विकासोच्या चेअरमन पदी त्रिलोकासिंग पाटील यांची निवड
धरणगाव – तालुक्यातील सुरुवातीपासून अंत्यंत चुरशीच्या असलेल्या भोद बु., खु., विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत आज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत चेअरमन पदी त्रिलोकासिंग किशोरसिंग पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी मुरलीधर उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अंत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासून रंगत बघावयास मिळत होती. आज पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत मुरलीधर उत्तम पाटील, हरचंद चिंतामण पाटील, गोपीचंद ओंकार पाटील, साहेबराव रमेश पाटील, वसंत नागो बडगुजर, नारायण चत्रू सोनावणे, संभाजी भालेराव पाटील यांच्यासह भोद बु. तसेच भोद खु. येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. भोद बु.,खु. विकासो सोसायातील मागील ५० वर्षात पहिल्यांदाच राजपूत समाजाच्या व्यक्तीची चेअरमन पदी निवड झाली हे विशेष. प्रसंगी निवड झालेल्या पदाधिकार्यांनी एकच जल्लोष केला.