ताज्या बातम्या

भोरटेक शिवारात रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

जळगांव प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव

कजगाव ता. भडगाव : भोरटेक शिवारात डाऊन रेल्वे लाईन खांबा नंबर ३४४/१५ ते ३४४/१३ दरम्यान रेल्वेतून पडून अंदाजित २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहेरेल्वे अपघाताची घटना दिनांक २९ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली असून मयत तरुणाच्या डोक्याला व हाता पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे मयताची उंची साडे पाच फूट असून दोन्ही हाताच्या आंगठयाला इंग्रजी मध्ये जी. एस.असे गोंधले आहे रेल्वे कर्मचारी हिलाल गौतम बागुल यांच्या खबरीवरून भडगाव पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे भडगावचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *