ताज्या बातम्या

मध्य रेल्वे प्रशासनाने हद्द कायम केल्याने रेल्वे लगत चे शेतकरी अडचणीत

रावेर (प्रतिनिधी) कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात तून गेलेल्या भारत सरकारच्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या बुऱ्हाणपूर विभागाअर्तगत असलेल्या मध्य रेल्वेच्या अप व डाऊन लाइनच्या दोघं बाजूंनी आपल्याला जमीनीवर दोन्ही बाजूंनी रेल्वे प्रशासनाने ताबा घेत हद्द कायम करण्यात आली आहे
वाघोड मोरगाव रोडवरील रेल्वे पुलाजवळू वाघोडा स्टेशन कडे दोन्ही बाजूंनी रेल्वे प्रशासनाने आपली जमीन वर शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढत रेल्वे पटरी पासून असलेल्या जागांचे रितसर मोजमाप करत मशिनरी घ्या सहाय्याने जमीनीत पाच पाच फूट अंतरावर उभे पोल उभे पुरवून त्यांना खडी सिमेंट ने क्रांकीट ने खडे भरून लोखंडी रॉड उभे करून त्यावर आडवे पत्रे मारत कायमस्वरूपी उपाययोजना करून जागा ताब्यात घेतली असल्याने आता रेल्वे हद्दीत गुरेढोरे,बकऱ्या व मोटापणे वावरू शकत नाही
आज पर्यंत रेल्वे हद्दीतून रेल्वे लगत चे शेतकरी वाहीवाट करून शेती मशागत व शेती माल घरपोच होत होता परंतु रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे लगत असलेल्या तात्पुरता रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची वाहवाटीची व मशागती साठी शेतीत बैलजोडी वा ट्रॅक्टर जात नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे त्या शेतकऱ्यांना पुर्वरत रस्ता शोधून आपली वहीवाट कायम करण्यात कमालीची कसरत करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *