ताज्या बातम्या
मराठा आरक्षणासाठी आणखी एकबळी
अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील अमोल वैजनाथ पौळ या 30 वर्षाच्या युवकाने मराठा आरक्षण मिळावे या साठी दिनांक 06 जुलै रोजी रोजी स्वतःचे आयुष्य संपवले. गेल्या एक वर्षापासून अमोल मराठा आरक्षण लढ्यात मोठ्या हिरारीने सहभागी होता. गेल्या काही दिवसापासून अमोल नैराश्येत होता. आज अखेर त्याने जगाचा निरोप घेतला. आरक्षण लढ्यातील एक बिनीचा शिलेदार गमावला. मराठा समाजास आरक्षण मिळउन देणे हीच खऱ्या अर्थाने अमोल यास श्रद्धांजली असेल. अमोल याचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. असे अहमदपूर मराठा आरक्षण समितीच्या वतीने सांगितले.