मराठा समाजा तर्फ़े रावेर लोकसभा उमेदवार म्हणून चहार्डी च्या कोमलताई पाटील यांच्या नावाला पसंती ; बी.आर.पक्षाचा देखिल पाठिंबा
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये मोठा संखेने उपस्थित राहिला. या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. यामध्ये लवकरच येत्या 30 तारखेपर्यंत गाव बैठका घेऊन आपला अहवाल कळवावा त्यावरील लवकरच पुढील दिशा ठरवू असे देखील ते म्हणाले या अनुषंगाने रावेर लोकसभा साठी इच्छुक असलेल्या कोमल ताई बापूराव पाटील यांनी आपण रावेर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले यावरती लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी देखील पाटलाकडून सांगण्यात आले रावेर मधील जागा ही बीजेपी च्या विरुद्ध आपण अपक्ष लढणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव, उत्तर महाराष्ट्र सहसमन्वयक संदीप खुटे, चोपडा विधानसभा प्रमुख समाधान बाविस्कर ,योगेश पाटील ,नाटकर हर्षल पाटील बापूराव पाटील ,अनिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.