ताज्या बातम्या

मविआच्या वतीने धरणगावात मुक आंदोलन….

धरणगाव – येथील कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा बंद मागे घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी बंद मागे घेतला परंतु बदलापूर तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या विकृत कृत्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात मुक आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर धरणगावात देखील महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला व हातांना काळ्या फिती बांधून या सर्व घटनांचा निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी उबाठा सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी महायुती सरकारच्या दडपशाही धोरणावर ताशेरे ओढले तसेच राज्यातील अराजकतेच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था नसल्याने हे सर्व घडत आहे आणि याला गृहमंत्री जबाबदार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी पीडितांना न्याय व दोषींना कठोर शासन व्हावे, अशी मागणी केली.
मुक आंदोलन प्रसंगी उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितु धनगर, युवा सेना शहरप्रमुख परमेश्वर महाजन, किरण अग्निहोत्री, अमोल चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनंत परिहार, गणेश सोनवणे, नंदा महाजन, सलिम बेलदार, ताराचंद सोनवणे, साजिद पटेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, भगवान शिंदे, नईम काझी, खलील (बंटी) खान, विनायक पाटील, प्रफुल पवार, अमोल महाले, दुर्गेश चौधरी, रमजान शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *