महागड्या गाड्यांसाठी इन्शुरंस कंपनीला फसविणारा मोठा गट धरणगाव तालुक्यात सक्रीय
जळगाव – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात महागड्या गाड्यांसाठी इन्शुरंस कंपनीला फसविणारा मोठा गट धरणगाव तालुक्यात सक्रीय असून यात मोठ-मोठाल्या व्यक्तींचा सहभाग आहे. इन्शुरन्स कंपनीला फसवून मोटार सायकल, फोर व्हीलर, कार, फ्रीज, टीव्ही, इत्यादी वस्तूंसाठी इन्शुरन्स कंपनीला फसविण्याचा धंदा गेल्या दोन वर्षांपासून धरणगाव तालुक्यात सुरु आहे.
धरणगाव तालुक्यात मागील काही वर्ष भरापासून एक मोठा समुह मोठ्या प्रमाणात सक्रीय असुन सदर समूहामधील व्यक्ती हे मरण पावत असलेल्या, अथवा मेलेल्या व्यक्तींच्या नावाने इन्शुरन्स काढून त्यांच्या नावाने मोटार सायकल, कार, मोठी रक्कम यांचा वापर करून ते मरणाऱ्या अथवा मयत व्यक्तीचा इन्शुरन्स काढून पोलिसांची दिशाभूल करून अपघात झाल्याचे दर्शवून मोठी रक्कम मयत व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्याच्या उद्देशाने मयत व्यक्तीच्या नातेवाईक यांना आमिष दाखवून मयत व्यक्तीच्या नावे मोटार सायकल, कार, महागड्या गाड्या, फ्रीज, टीव्ही, मोबाईल इत्यादी काढून इन्शुरन्स कंपनीची, शासनाची, पोलिस प्रशासनाची फसवणूक करीत आहेत. यात धरणगाव तालुक्यातील मोठ्या व्यक्तींचा सहभाग असून काही लोकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. तसेच धरणगाव शहरातील एका माजी नगरसेवकाचा देखील यात सहभाग आहे.
धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अश्या प्रकारे अपघात घडवून इन्शुरन्स कंपनीला फसवून, तसेच शासनाची, प्रशासनाची, इन्शुरन्स कंपनीची, पोलिस प्रशासनाची व नागरिकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमविण्याचे काम काही इसमांनी सुरु केले आहे.
सदर समूहामध्ये धरणगाव शहरातील तसेच धरणगाव ग्रामीण मधील काही युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सदर समूह मोक्का गुन्हेगारी या समूहात गणले जात असल्याने पोलिस प्रशासनाने याचा पूर्ण तपास करून यातील सहभागी गुन्हेगारांना अद्दल घडविण्याची मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे. यामुळे योग्य त्या व्यक्तींना विमा कंपनीकडून नाहक त्रास देण्याचा उद्देश होवू नये अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.