महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आदर्श मुख्यध्यापक अवॉर्डने डॉ.मनोज पाटील सन्मानित

पाचोरा – डॉ.मनोज दिलीप पाटील यांनी कोरोना काळात कोवीड -19 या विषाणू वर लेख लिहून ऑनलाईन प्रकाशित केला होता. त्या लेखा मुळे जगभरातील तज्ञांना कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांनी ‘ट्रान्सडरमल प्याचेस’ च्या डिझाईन चे इंडियन पेटंट मिळवले आहे. असे विविध 5 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. फार्मसी मध्ये त्यांचे, फार्मासिटीकल केमिस्ट्री, क्वालिटी अशूरन्स तसेच फार्मास्युटिकल जुरिस्प्रूडेनस या विषयांवर त्यांनी पुस्तक लिहले आहेत. इंटरनेशनल जर्नल्स मध्ये जवळपास 15 लेख त्यांचे प्रकाशित झालेले असून भारतीय जर्नल्स मध्ये जवळपास २० लेख प्रकाशित झालेले आहेत. विविध सामजिक कार्यात अग्रेसर असणारे त्यांच्या मुलाचा प्रत्येक वाढदिवस हा अंध व अपंग विद्यार्थ्यांसोबत साजरा करतात. डॉ. मनोज पाटील यांनी फार्मसी मधील सर्वात महत्वाची GATE परीक्षेत त्यांनी 97 टक्के मिळविले आहेत. गोव्यात मास्टर ऑफ फार्मसीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. तसेच त्यांनी जळगांव जिल्ह्यात जवळपास 5 नवीन फार्मसी कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्राचे दालन उघडुन दिले आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी मागील 5 वर्षापासून जे काम केले आहे याची दखल घेत त्यांना आज पाचोरा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ‘आदर्श मुख्यध्यापक अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.