महाराष्ट्र सिमालगत असलेल्या म.प्र तील फरार आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

रावेर (प्रतिनिधी) कमलेश पाटील

महाराष्ट्र सिमालगत असलेल्या मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधव्या पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भगवान राठोड हा रावेर तालुक्यातील पाल भागात संशयास्पद अवस्थेत फिरत असतांनाच रावेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्यास सेंधवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी आरोपी माहिती दिल्यास रोख दोन हजार रुपये बक्षीस घोषित केलेल्या एका गुन्ह्यातील फरार महेंद्र भगवान राठोड हा रावेर येथून वीस किलोमीटर दूर असलेल्या पाल भागात संशयास्पद अवस्थेत फिरत असतांनाच रावेर पोलिसांनी त्याला विचारपूस करत ताब्यात घेतलं असतांना तो फरार आरोपी असल्याचे समजले.. यामध्ये रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तुषार पाटील, पोलिस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलिस शिपाई महेश मोगरे , प्रमोद पाटील, तसेच माधुरी सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली..