महाविहार बावरीनगर दाभड येथे होणार्या सामूहिक मंगल परिणय सोहळा आयोजनाबाबत बैठक संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी, संदीप कदम
शांतीदूत प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने पुज्य भिक्खू बुद्धभूषण यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक मंगल परिणय सोहळ्याच्या आयोजन करण्यासंबंधी 14 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.सदर बैठकीमध्ये महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे शांतीदूत प्रतिष्ठानच्या वतीने दि. 11 मे 2025 अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या एकदिवस आधी सामूहिक मंगल परिणयाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक तथा महिला श्रामणेर शिबिराचे आयोजन महाविहार बावरीनगर दाभड येथे करण्यात येईल व महाविहाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बुद्धजयंतीच्या पूर्व संध्येस पू. भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर बैठकीत खालील मान्यवरांच्या उपस्थितीत वरील विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. पू. भिख्यू बुद्धभूषण यांच्या अध्यक्षीय उपदेशानंतर अॅड. एम.जी. बादलगावकर यांनी आभार मानले. या बैठकीला पू. भिख्यू बुद्धभूषण प्रा. बी.एम. वाघमारे, प्रा्र.डॉ. मिलींद भालेराव, जी.जी. कोलते, शुद्धोधन मांजरमकर, सुभाष काटकांबळे, शिवाजी सोनकांबळे, जनार्धन जमदाडे, सुरेश व्यवहारे, उत्तमराव भंडारे, एम.पी. गायकवाड, बापुराव मस्के, भगवान गायकवाड, डी.पी. गायकवाड आदी उपस्थित होते.