ताज्या बातम्या

माता व बालसंगोपन या विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती

चोपडा – आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व जपायगो या सामाजिक संस्था मार्फत आदिवासी पाडयामध्ये माता व बाल संगोपन या विषयावर प्रकल्प राबवित आहे ,त्या अंतर्गत पथनाटच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे .सदर प्रकल्पा अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर व लासुर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना गर्भारपणातील काळजी , शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व योजना विषयी माहिती व्हावी या उद्देशाने जनजागृती व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आदिवासीबहुल भागात दवाखान्यात प्रसुती करण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आधार संस्थे मार्फत गावगावात जाऊन पथनाट्य सादर केले जात आहेत. या पथनाट्याच्या माध्यमातून गरोदरपणात घ्यायची काळजी, पोषक आहार, लसीकरण, संस्थात्मक प्रसुती, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.या पथनाट्याची थीम बहुचर्चित हिंदी चित्रपट शोले यावर आधारित असून विरू, जय, बसंती, गब्बर यांच्या पात्राच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. सोप्या भाषेत आदिवासी महिलांना व नागरिकांना आरोग्याचे संदेश दिले जात आहे. आता पर्यंत बोराअंजठी, उत्तम नगर व कर्जाने या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सदर नाट्यामध्ये आम्रपाली मुरार, उज्वल भगत, लेनिन महाजन, सागर पावरा, दीपक संदानशिव, गणेश कुंभार, शिवा बारेला, प्रीती बारेला, निशांत कोळी इत्यादी आधार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कलाकार म्हणून सहभाग घेतला आहे.सदर उपक्रमाचे कौतुक चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *