मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर येथे दाणापाणी उपक्रमअंतर्गत विवध कार्यक्रम संपन्न

जळगांव – दाणापाणी उपक्रमअंतर्गत शाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटे बनवणे व घोषवाक्य स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिराचा नाविण्यपूर्ण उपक्रम जळगांव येथील मानव सेवा मंडळ ,जळगांव संचलित प्राथमिक विद्या मंदिर ,जळगांव यांच्या नाविण्यपूर्ण उपक्रम – दाणापाणी या उपक्रम अंतर्गत शाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटे बनवणे याचे प्रात्यक्षिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक ,पर्यावरण मित्र सुनिल दाभाडे यांनी करून दाखविले. पक्ष्यांसाठी काय करायला हवे. 1) अंगणात ,गॅलरीत पिण्यासाठी पाणी ठेवणे. 2) कृत्रिम घरटे लावून आसरा देणे. 3) ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. 4) शहरातील टॉवर चे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घेणे. 5) घराजवळ बागेत एक तरी वृक्ष लावावे. 6) जखमी पक्ष्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे. 7) पक्ष्यांना वाचवा ,पर्यावरण वाचवा उपक्रम राबविणे. 8) गलोरीवर कायमची बंदी करावी. 9) नायलॉन माजांवर बंदी करणे.असे शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच घोषवाक्य स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे नैसर्गिक घरटे देखील दाखवण्यात आले. घरटे बनवणे स्पर्धेत- वेदिका पाटील ,साक्षी वानखेडे ,ईशिता रोटे, राजदिप झाल्टे ,लक्ष पाटील, विनित पाटील, तेजल पारगांवकर, सिध्दी पाटील, चैतन्य पाटील ,रितिक्षा पाटील ,धनश्री माकोने ,हर्षदा पाटील, वैष्णवी सपकाळे, घोषवाक्य बनवणे स्पर्धेत – धीरज जाधव, योगिता सोनार, गायत्री सोनवणे, वैष्णवी पाटील ,दक्ष महाले ,जयेश पाटील ,खुशी नेरकर ,खुशी चव्हाण ,हेमराज साळुंखे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.