ताज्या बातम्या

माळी समाजाचा ऑनलाईन वधुवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

धुळे – व्हाट्स ॲप वर वधुवर सुचक मंडळ स्थापन करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवा निॠत शिक्षक पोपटराव सोनवणे व त्यांचे चिरंजीव रामदास सोनवणे यांनी आपल्या वधुवर सुचक मंडळाकडून दिनांक ९/४/२०२३रोजी संध्याकाळी ठिक ६:०० वाजता ऑनलाईन वधुवर परिचय मेळावाचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्वाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक शब्दगंगा चे संपादक देवेंद्र पाटील उपस्थित होतेधकाधकीच्या जिवनात नियमित कामकाजातुन वेळ काढणे सर्वांनाच अवघड होत असते त्यात घरात मुलामुलींचे लग्न जमवण्यासाठी वधुवर संशोधन करणे आणि त्यासाठी लागणारा मोठा वेळ काढणे अवघड होत असते त्यात दैनंदिन कामकाजामुळे जनसंपर्क कमी झालेला असतो अशातच वधुवर मंडळ हा वधुवरच्या पालकांसाठी मोठा आधार ठरत असतो कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने वधुवर संशोधन कसे करता येईल यासाठी पोपटराव सोनवणे व रामदास सोनवणे हे नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते याचाच एक भाग म्हणून दिनांक ९/४/२०२३रोजी संध्याकाळी ६:००वाजता ऑनलाईन वधुवर परिचय मेळावाकडे बघता येईल त्या मेळाव्यात शेकडो वधुवरच्या पालकांनी व वधुवरांनी आपला सहभाग नोंदविला अत्याल्प काळात शेकडो वधु वरांधी आपला व्यवस्थीत परिचय करून दिला. या वधुवर परिचय मेळाव्यात सहभागी झालेल्या वधुवरांच्य व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता व असे मेळावे दर महिन्याला घेण्यात यावेत असा आग्रह वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजक पोपटराव सोनवणे व रामदास सोनवणे याच्या धरण्यात आला वधुवरच्या व त्यांच्या पालकांच्या विनंतीचा विचार करता प्रत्येक महिन्याला असे वधुवर परिचय मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बाबतचे सविस्तर टाईम टेबल ग्रुपमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे पोपटराव सोनवणे व रामदास सोनवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *