माहाविकास आघाडीची अहमदपूर-चाकूर विधानसभेची जागा काँग्रेस(आय) पक्षाला सोडावी कार्यकत्याची एकमुखी मागणी

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपुर : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागावाटपा दरम्यान अहमदपुर- चाकुर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षास द्यावी अशी मागणी करणारा ठरावा अहमदपुर येथील दिपवर्ष मंगल कार्यालयत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या व्यापक बैठकीत घेण्यात आला.ठराव घेऊन पक्षश्रेष्ठींकडे अहमदपुर-चाकुर विधानसभा मतदारसंघ सोडविण्यासाठी लवकरच शिष्मंडळ भेटणार आहे.अहमदपुर-चाकुर विधानसभा मतदारसंघातील जनता ही कॉग्रेस पक्षाच्या विचारसरणीला मानणारी आहे. स्वातंत्र्य काळापासून इंदिरा गांधी यांना मानणारा मतदार या भागात पहावयास मिळेल.आगामी विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याने अहमदपुर- चाकुर मतदार संघातील प्रमुख कार्यकत्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले.मतदार संघात कॉग्रेस पक्षाला मानणारा मोठा गट असुन पक्षाच्या विचार धारा मानणारे असंख्य कार्यकर्ते व मतदार आहेत. मतदारसंघात कै.विलासराव देशमुख यांनी साठवण तलाव पाझर तलावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती केली आहे.चाकुर तालुक्यात शिवराजी पाटील चाकुरकर यांनी बीएसएफ सारखे महत्त्वाचे केंद्रातील योजना आणली आहे. मतदारसंघात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या माध्यमातून शुन्य व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुण दिले. बचत गटाच्या कर्ज उपलब्ध करून दिले. मांजरा परिवाराच्या मार्फत शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न असेल दिलीपराव देशमुख, आ. अमिताभैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला विक्रमी भाव देण्याच काम असेल लातूर प्रमाणे अहमदपूर-चाकूर मतदार संघाच्या विकासात त्यांचा सिंहाचा आहे.त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळे मतदार संघातील शेतकरी,शेतमजुर, व्यापारी यांचा फायदा झाला आहे. अशा अनेक विकासात्मक मुद्या चर्चा झाली. मागील काळात अपक्ष व आघाडीच्या राजकारणात काँग्रेसचा फायदा घेऊन बरेच आमदार दिलीपराव देशमुख,अमित देशमुख यांच्यामुळे निवडून येऊन सुध्दा पक्ष सोडुन जातीवादी पक्षा सोबत सत्तेसाठी घरोबा करून बसले आहेत.मतदारसंघात कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्थिर राहत नाहीत. असे अनेक प्रश्न चर्चिले गेले.आघाडीत कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सनमानाची वागणूक मिळत नाही.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ महाविकास आघाडीतुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच सोडवून द्यावे अशी भावना सर्व नेते प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पाटील होते.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले अहमदपुर कॉग्रेस पक्षाचे कार्यध्यक्ष शिराजोद्दीन जहागीरदार, विलासराव पाटील चाकुरकर,सांबातात्या महाजन, एन.आर.पाटील,अनिल चव्हाण,श्रीकांत बनसोडे,कलीमोद्दीन अहेमद,भारत रेड्डी,माधव कोळगावे,भाग्यश्री सिरसागर,डॉ.अशोक सांगवीकर,भारत रेड्डी,सजंय पवार,,चंद्रकांत मद्दे, धनजय कोरे,आदीने आपले मत व्यक्त केले.बैठकीत ठराव घेण्यात आले.चारीही ठरावाला कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन ठराव मंजुर करण्यात आले.लोकसभेचे खा.शिवाजी काळगे विजयी झाल्याबदल अभिनंदनांचा ठराव घेण्यात आला.महाविकास आघाडीतुन अहमदपुर-चाकुर विधानसभा कॉग्रेस पक्षालाच सोडवून द्यावी,इच्छुक उमेदवारांचा विचार व्हावा,मतदार संघातील इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्याची सर्वस्वी अधिकार दिलीपराव देशमुख,अमित देशमुख,शिवराज पाटील,धिरज देशमुख,खा.डॉ.शिवाजीराव काळगे,यांना अधिकार देण्यात आले.
अहमदपुर-चाकुर तालुक्यातुन कॉग्रेस पक्षाचे पदधिकारी कार्यकर्ते आले होते.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील,सांबअप्पा महाजन,चाकुर तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर,कार्याध्यक्ष शिराजोद्दीन जहागीरदार,सौ.भाग्यश्री सिरसागर,उपसभापती सजंय पवार,डॉ.अशोक सांगवीकर,भारतदादा रेड्डी,कलीमोद्दीन अहमद, ADV,माजी सभापती माधव कोळगावे, पप्पुभाई शेख,विकास महाजन,सलीमभाई तांबोळी,शुक्रभाई जहागीरदार,संचालक शिवाजी पाटील .बालाजी कातकडे शुकुर जाहगीरदार तालुका अध्यक्ष अजा प्रकाश ससाणे दिनकर कदम शिवाजी जंगापले सदाम पठाण शाहू साखरे बुटुर शेख,सुरेश मुंडे,सुभाष शंकरे,रियाज पठाण,कदीर शेख,बाळु इरवाणे,गफुर मासुलदार,सचिन चाकुरकर,शहाजी पाटील,आदी उपस्थित होते.कार्यक्रमांचे प्रस्ताविक माजी सभापती चंद्रकांत मद्दे यांनी केले.सुञसंचलन सोशल मिडिया प्रमुख चाकुर सलीमभाई तांबोळी यांनी केले.आभार शहर अध्यक्ष चाकूर पप्पुभाई शेख यांनी मानले.
विधानसभेसाठी अहमदपुर-चाकुर इच्छुक उमेदवारांनी १० अॉगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले आहेआहे.
