ताज्या बातम्या

मा.आ.चंद्रशेखर कदम यांची इफकोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड

राहुरी प्रतिनिधी- आशिष संसारे

राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांची इंडियन फारमरर्स फर्टीलायझर को. ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफकोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल देवळाली प्रवरात आनंद व्यक्त करून विविध संस्थानी माजी आ. कदम यांचा सन्मान केला. नाशिक येथील कालिका माता देवी संस्थानच्या सभागृहात बुधवारि इफकोच्या महाराष्ट्र राज्य जनरल बॉडी सदस्य पदासाठी बिनविरोध निवड प्रकिया पार पडली. यामध्ये चंद्रशेखर कदम यांची राज्य जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे. देवळाली प्रवरा सोसायटी डेपो येथे माजी आ. कदम यांच्या निवडीबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते स्व. अण्णासाहेब कदम यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बागायत पीक सोसायटी, सत्यजित कदम फाउंडेशन यांच्या वतीने चंद्रशेखर कदम यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम, मच्छीन्द्र कदम, गोरक्षनाथ मुसमाडे, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, माजी नगरसेवक सचिन ढुस, अमोल कदम, किशोर गडाख, सुधीर पठारे, सोसायटीचे चेअरमन उत्तम मुसमाडे, माजी चेअरमन संतोष चव्हाण, सुधीर टिक्कल, सूर्यभान गडाख, मंजाबापू वरखडे, बाबासाहेब शेटे, गणेश अंबिलवादे, किशोर तोडमल, सुदाम भांड, सचिन शेटे, सतीश वने, पप्पू टिक्कल, मुनिर शेख, बाळासाहेब कडू, चेतन कदम, मंगेश ढुस, आकाश गडाख, कार्तिक मुसमाडे , ओंकार लांडे आदिंसह देवळाली सोसायटी, बागायत पिक सोसायटी अधिकारी व कर्मचारी तसेच सत्यजित कदम फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *