मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थाचं मानधन त्वरित वितरित करा अन्यथा अदोलन : विनोद रोकडे

‘लाडक्या बहीण’ला प्राधान्य, मात्र ‘भावाला’ सावत्र वागणूक ?
धरणगाव प्रतिनिधी / राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना’चा आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत फज्जा उडताना दिसतो आहे. ‘बहीण लाडकी’ असली तरी सरकारने ‘भावा कडे सावत्र वागणूक देत मानधनच थकवले आहे! सदर युवा प्रशिक्षणार्थी योजना जून २०२४ मध्ये राज्यभरात कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनुभव घेण्याची संधी देण्यात आली. सुरुवातीच्या सहा महिन्यांत या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन देण्यात येयला हवे होते. परंतु त्यातही काही महिन्याचे वेतन थकीत आहे. मात्र, सहा महिने संपल्यानंतर शासनाने योजनेचा कालावधी आणखी पाच महिने वाढवण्याचा निर्णय घेतला. वाढवलेला कालावधी सुरू झाला.
त्यामुळे मागील काही महिन्यांपासून मानधन थकले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारकडून वेळेवर मानधन मिळेल, हा विश्वास ठेवून ही जबाबदारी पार पाडणाऱ्या तरुणांना आता मानसिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने बहुचर्चित ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोट्यवधी रुपये जाहीर करून वाटप सुरू केले असले, तरी ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना’ सारख्या युवकांशी व त्याचा कडून आस्थापना मध्ये काम केले जात असूनही त्याचा मोबदला मिळत नसून संबंधित योजनेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना निर्माण होत आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षण माहे फेब्रुवारी 2025 पासून हजेरी मस्टर साठी जि प विभागा कडून वारंवार फिरावं लागत असून जिल्हा कौशल्य विभाग जळगाव आणि राज्य सरकारने या विषयाकडे गांभीयनि लक्ष देत तात्काळ थकीत मानधन येत्या आठ दिवसांत वितरित न केल्यास प्रशिक्षनार्थी तर्फे तीव्र अदोलन करण्यात येईल.