ताज्या बातम्या
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी तर्फे मान्यवरांचा सत्कार…
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
मुस्तुफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कुल व ज्यू. कॉलेज, चोपडा या शाळे तर्फे शालेय समितीचे चेअरमन फिरोज खान हाजी महेबूब खान यांची शरदचंद्रिका पतपेढी मध्ये संचालक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली यांच्या हस्ते तर राज मोहम्मद शिकलगर यांना दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष लियाकत अली सै. नूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अब्दुलह्क सर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली यांनी अभिनंदनपर भाषण केले. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तन्वीर सर, समनव्यक डॉ. अजहर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.