ताज्या बातम्या

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीकडुन चोरीच्या चार मोटर सायकल जप्त ; चोपडा शहर पोलिस स्टेशनची कारवाई

चोपडा – शहर पोलिस स्टेशनने मोठ्या शिताफीनेदाखल गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ शेषराव तोरे यांनी सदर गुन्ह्यात आरोपी पवन संजय साळुंखे, रा. सुंदरगढी चोपड़ा तसेच अमोल राजेंद्र अहिरे, रा. खडगांव ता. चोपडा यांना अटक करुन तसेच , बालक सागर प्रल्हाद अहिरे, रा. खडगांव ता.चोपडा यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल एम. एच. 18. ए. एम. 8666, एच.एफ. डिलक्स मोटार सायकल तसेच, या व्यतिरीक्त एम. एच. 19 बी बी 5004 हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटार सायकल व एम.पी. 10. एन.ए.3444 एच एफ डिलक्स कंपनीची मोटार सायकल, विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची एच.एफ डिलक्स मोटार सायकल अशा एकुण अंदाजे 1,20,000/-रुपये किंमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

वरील गुन्ह्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांना अटक करुन त्यांना आज मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक 31/07/2023 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर आरोपीतांनी या व्यतिरीक्त अजुन गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर आरोपीतांकडुन आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व यापुर्वी घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक जळगांव यांनी वेळोवेळी गुन्हे बैठकी दरम्यान तसेच दैनंदिन आदेश देत असतात त्यांच्या आदेशान्वये व रमेश चोपडे , अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव यांच्या तसेच, मा.कृषीकेश रावले सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. के. के. पाटील साहेब, स. पो. नि. अजित सावळे, स.पो.नि.संतोष चव्हाण, पो.उप नि. घनशाम तांबे सहा. फौ. सुनिल पाटील, पोहेकॉ शेषराव तोरे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ दिपक विसावे, पोहेकॉ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ शिवाजी धुमाळ, पोहेकाॅ ज्ञानेश्वर जवागे, पोहेकॉ प्रदिप राजपुत, पोना संतोष पारधी, पोना हेमंत कोळी, पोना प्रमोद पाटील, पोना मधुकर पवार, पोना संदिप भोई, पोना किरण गाडीलोहार, पोना ईश्वर धनगर, पोकों मिलींद सपकाळे, पोकों प्रकाश मथुरे, पोकों रविंद्र पाटील, पोकॉ प्रमोद पवार, पोकों विजय बच्छाव, पोकॉ सुमेर वाघरे, पोकों शुभम पाटील, पोकों आत्माराम अहिरे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *