मोबाइल व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकतरी कला शिका : डॉ. संजीवकुमार सोनवणे
धरणगाव : श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे बासरी प्रशिक्षण कार्यशाळा
मोबाईल मुक्ती ही कलेमुळेच साध्य होते. कला गुणांमुळेच माणसाला प्रतिष्ठा व ओळख मिळते. कला शिकण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा परिस्थितीची नव्हे तर साधनेची गरज असते असे मार्गदर्शन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी श्री. आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्टतर्फे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संगीत महर्षी आर.बी.पाटील , प्रसिद्ध बासरी वादक योगेश पाटील, प्रा. अरूण पाटील हे होते. अतिथींचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयांस जैन, प्रतीक जैन, निकेत जैन, सुभाष जैन यांनी केले.या प्रशिक्षणात बासरीवादक योगेश पाटील यांनी बासरी वाद्याचा इतिहास आणि बासरीवादनाच्या कौशल्याविषयी सखोल माहिती देऊन प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्ष बासरीवादनाचे प्रात्यक्षिक करून घेतले. या शिबिरात ८० प्रशिक्षणार्थींनी सहभागी नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक जैन यांनी केले. सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन यांनी तर आभारप्रदर्शन श्रेयांस जैन यांनी केले. यावेळी गायक नाना पवार, सुभाष जैन, निकेत जैन आणि रसिकांची उपस्थिती होती.