ताज्या बातम्या

मौजे पाडले खुर्द (रावेर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत “मेरी माटी मेरा देश” अभियान राबविण्यात आले…

प्रतिनिधी- चोपडा तालुका/ विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी..आज मौजे पाडले खुर्द (रावेर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वतंत्रता सैनानी आणि भारत मातेच्या वीर सपुतांचा सन्मान करण्यासाठी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, वीरो को वंदन हे अभियान राबवून, ग्रामपंचायत परिसरात गांवातील माती अमृत कलश मध्ये संकलित करण्यात आली. तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच ७८२००७८२०० मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्यात येऊन *सरल अॅप डाऊनलोड करण्यात येऊन, मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, विजय महाजन, संजय महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत अप्पा, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, नितीन पाटील, असिफ पिंजारी, उमेश कोळी, सोनू पाटील, ईश्वर धोंडू महाजन, सरपंच गजानन चौधरी, ग्रा.प.सदस्य महेंद्र पाटील, पंकज चौधरी, सुरेश अटकाडे, पोलीस पाटील डॉ.किशोर पाटील, ग्रामसेवक श्रीमती धांडे, गुलाबराव एकनाथ चौधरी, भगवान नाना चौधरी, गोरख तात्या ई. व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *