यवतमाळ-अतिवृष्टीमुळे येवती येथील शेतकऱ्याच्या शेतातील पक्की विहीर खचली: साडेसहा लाखाचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर
राळेगाव – तालुक्यातील येवती येथील उमेश गोविंदराव पोहदरे यांच्या शेतामधील पक्के बांधकाम केलेली विहीर सध्या सुरू असलेल्या सतत धार पावसाने खचून सदर शेतकऱ्याचे ६,५५,५०० रुपयांचे नुकसान झाले
येवती या गावचे उमेश गोविंदराव पोहदरे यांची मौजा पार्डी गट नंबर २१ या शेतामधील पक्के बांधकाम केलेली विहीर ही दिनांक २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णता खचून त्या विहिरीचे पक्के बांधकाम जमिनीमध्ये गडल्या गेले. विहिरी सोबतच विहीर मध्ये असलेली पाण्याची मोटर, ग्राव्हल फिल्टर, ड्रीप वेंचुरी पाईप , साधे फिल्टर व पाईपलाईन याबरोबरच पक्के बांधकाम केलेला विहिरीचा ढाच्या जमिनीमध्ये खोल खड्ड्यात गडला गेला. सदर शेतकऱ्याचे विहिरीचा तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ६,५५,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच नापिकी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाला असताना अतिवृष्टीने त्याची विहिरी गडल्या गेल्यामुळे सदर शेतकरी हतबल झाला असून शासनाकडून काय मदत मिळते या प्रतीक्षेत आहे.