ताज्या बातम्या

यवतमाळ – जळका अंगणवाडीत सेवा निवृत मदतनीस यांचा निरोप समारंभ व सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी – विलास साखरकर

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अंतर्गत अंगणवाडी केन्द्र जळका येथे अंगणवाडी सेविका लता अवतारे यांच्या कल्पनेतुन व पुढाकाराने सेवा निवृत झालेल्या मदतनीस श्रीमती वच्छलाबाई भाजपाले व बेबीबाई ठुठुरकार यांचा साडी चोळी देवुन छोटेखानी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव हे होते, प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.ठाकरेसर मुख्याध्यापक,फुलझेलेसर, कोहचाडेसर,जगदिश ठाकरेसर केन्द्र प्रमुख , सागर इंझळकर शिक्षक,आडे शिक्षिका,श्रीमती लता माटे,पंचफुला पांडे, सावित्री पवार, गुंफा किनाके, योगीता सिडाम, लता कोळसे, हभप विठ्ठल महाराज भाजपाले, हभप माणीकमहाराज पाल, सिमा मेश्राम,कैलास मेश्राम हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लताताई माटे व प्रास्ताविक लता अवतारे यांनी केले, यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन्हीही मदतनीसला सेवा निवृत झाल्यानंतर लगेचच एकरकमी लाभ मिळाला त्यामुळे दोन्ही मदतनीस यांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक ठिकाणी मदतनीस सेवा निवृत झाल्यानंतर त्यांचा सत्कार घेणे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे, सर्व मदतनीस यांचा सेवा निवृत नंतर सत्कार झाला पाहिजे अशी भावना विठाळकर साहेब यांनी मनोगतावर व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *