युवा सेनेच्या मॉक टेस्टला तरूणाईचा प्रचंड प्रतिसाद

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
येथील पी हायस्कूल महाविद्यालयात सुमारे १०८ विद्यार्थ्यांची धरणगाव मध्ये रंगीत तालीमविद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकून त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. महाविद्यालायात झालेल्या मॉकटेस्टला तरूणाईचे उधाण आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. युवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०२५ मध्ये धरणगाव पी आर हायस्कूलमध्ये सुमारे १०८ विद्यार्थांनी नीट, सीईटीची सराव परिक्षा दिली.विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकून त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. महाविद्यालायात झालेल्या मॉकटेस्टला तरूणाईचे उधाण आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. युवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०२५ मध्ये धरणगाव येथे शनिवारी सुमारे १०८ विद्यार्थांनी नीट, सीईटीची सराव परिक्षा दिली. शहरातील पी आर हायस्कूल केंद्रावर पार पडलेल्या या परिक्षेला विद्याथ्र्यांनी रेकार्ड ब्रेक गर्दी केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे मुळे परिक्षा सुरळीत पार पडली असुन युवासेनेच्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे सचिव वरून सरदेसाई , यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यां साठी युवासेना पुरस्कृत मॉक टेस्ट (नीट सीईटी) परीक्षा शनिवारी पी आर हायस्कूल महाविद्यालयात पार पडली. मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवी साठी शासनाने महाराष्ट्र कॉमन एंटरन्स टेस्ट अनिवार्य केली आहे. सी.ई.टी,नीट परीक्षा २०२५ च्या पार्श्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा शनिवारी सकाळी १० सुरू करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणीचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी पी आर हायस्कूल चा परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती. पी आर हायस्कूल महाविद्यालायाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष पी आर हायस्कूल सोसायाटीचे सचिव डॉ मिलिंद डहाळे शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ प रा हायस्कूल माजी मुख्यध्यापक बी एन चौधरी सर डी एस पाटील सर , शिरसाठ मॅडम , शहर प्रमुख भागवत चौधरी सह युवासेना पदाधिकारी उपस्थित होतेया परिक्षेसाठी गेल्या दोन आठवड्यापुर्वी युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना नोंदणीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे १०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. धरणगाव मध्ये पार पडलेल्या परिक्षेला राज्यात सर्वाधिक संख्या असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान या विद्याथ्र्यांना परिक्षा देतांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणुन युवासेनेतर्फे पुर्णपणे दक्षता घेण्यात आली. परिक्षा केंद्रांवर युवासेनेतर्फे आरोग्य पथकही नियुक्त करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शुध्द आणि थंड पाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परिक्षा सुरू असतांना सेनेचे सह संपर्क प्रमुख श्री गुलाबराव वाघ , माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील , तालुका प्रमुख जयदीप पाटील शहर प्रमुख भागवत चौधरी , बापू महाजन ,राहुल रोकडे, विनोद रोकडे ,अरविद चौधरी, गोपाल पाटील, डोर डॉक्टरमंगेश पाटील, राहुल पाटील ,गजानन महाजन, हर्षल चौधरी ,गोपाल चौधरी, प्रथमेश चौधरी, यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.