ताज्या बातम्या

राजकारण न करता धरणगावकरांना फक्त पाणी हवंय

लोकनायक न्युज, अग्रलेख

धरणगाव I पाणी प्रश्न

धरणगावचा पाणी प्रश्न काही नवीन नाही, वर्षानुवर्षांपासून पाणी प्रश्नावर राजकरण सुरु आहे. प्रत्येक राजकारणी फक्त आप आपली पोळी भाजण्याच काम या पाणी प्रश्नावर करीत असतो. निवडणूक आली कि पाणी प्रश्न पेटतो. परंतु धरणगावकरांना पुरसे आणि शुद्ध पाणी पाजण्यात सर्वच जण अपयशी ठरले आहेत.

नागरिकांना मुळातच आपले हक्क काय आहेत ? याचा विसर पडला आहे. यासाठी ते स्वतः च जबाबदार आहे. अगदी *शेमाडा* देखील हे सांगतो कि, लोकं पैश्याने विकले जातात ! पण आपण देखील याच लोकांमध्ये असल्याचा मात्र नागरिकांना विसर पडतो. निवडणुकीच्या तोंडावर *चार दिन कि चांदणी*. छोट्याश्या लोभापायी, क्षणिक सुखासाठी आपण आपले मत विकतो. आणि विकलेल्या मताचे पुढील पाच वर्ष भोग भोगतो.

पाणी हे आपल्या मुलभूत हक्कांमध्ये येते आणि याचाच विसर आपल्याला पडलेला आहे. मुळात राजकीय पुढार्यांनी नागरिकांची *विकणारी* प्रवृत्ती ओळखून घेतली आहे. तीच प्रवृत्ती हि यासाठी कारणीभूत आहे. ‘पैसा टाका आणि त्याच्या दहा पट पैसा काढा’ हे गणितच बसले आहे. पुढारी हे जाणून आहेत. पुढार्यांनी जनतेला गुलाम बनवून ठेवले आहे.

पाणी प्रश्नासाठी फक्त सत्ताधारीच जबाबदार आहे असे नाही. यासाठी विरोधक देखील तितकेच जबादार आहेत. विरोधकांनी नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधार्यांना प्रवृत्त करणे गरजेचे होते. एन-केन प्रकारे पाणी प्रश्न कसा सुटेल यासाठी सत्ताधार्यांना भाग पाडणे गरजेचे होते. परंतु इच्छाशक्ती नसल्याने विरोधकांना सत्ताधार्यांना श्रेय देण्याची देखील मानसिकता हवी असते.

सध्याच्या परिस्थितीत गटा तटाच्या राजकारणात धरणगावचा पाणी प्रश्न पेटला आहे. मात्र त्यावर निर्णायक भूमिका कुणी घेतांना दिसत नाही. अथवा तो प्रश्न सोडविण्यासाठी कुणी पुढाकार घेतांना दिसत नाही. आजच्या घडीला प्रशासक असले तरी. प्रशासनाला सर्वानीच आजच्या घडीला मदत करणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या निश्चितच चुका झाल्या असतील मात्र आता त्या चुका दुरुस्त करून आता काय करता येईल यासाठी सर्वानीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नगरपालिका *क* वर्गाची असल्याने आजच्या घडीला नगरपालिकेला अनेक अडचणी हा प्रश्न सोडविण्यासाठी भेडसावत आहेत. यावर उत्तर शोधून त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेवटी नागरिकांना कोण काय करतंय ? याच्याशी देणं घेणं नाही. धरणगावकरांना आजच्या घडीला फक्त पाणी हवंय.

*जितेंद्र महाजन*

*लोकनायक न्यूज*, धरणगाव (जळगाव)

www.Loknayaknews.com

मो.९४२३४९२५९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *