ताज्या बातम्या

राजकारण हा ज्यांचा धंदा आहे ! : शिवराम पाटील यांचा बुलंद आवाज

जळगांव – राजकारण हे इतर देशांत कदाचित शासन प्रशासन चालवण्याचे क्षेत्र असू शकते.पण भारतात मात्र तो एक व्यवसाय आहे.सर्वात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून भारतात राजकारणाकडे पाहिले जाते.त्याला कारण ही तसेच आहे.करदाता नागरिक आणि निधीचा मालक मंत्री यात खूप मोठे अंतर आहे.ते भौगोलिक नाही तर शासकीय प्रशासकीय अंतर आहे.दोघात पोलादी भींत आहे.पालकमंत्रीच्या सभेत येण्यासाठी तुम्हाला खाणे पिणे,भाडे सर्वच मिळते पण डीपीडीसीच्या सभेत विनंती करूनही बसू दिले जात नाही.का?येथे चोरी करण्याचे नियोजन असते.ही विकास नियोजन समीती नसून भ्रष्टाचार नियोजन समिती म्हणून काम करते .म्हणजे नागरिकांनी फक्त कर भरायचा पण खर्च मात्र मंत्री ने करायचा असतो.मंत्री ने कसा खर्च करायचा किंवा नाही करायचा याबाबत करदात्याने विचारू नये.आधिकारीने विचारू नये.पोलिसाने विचारू नये.न्यायाधिशांनी विचारू नये.असे विचारण्याचे तंत्र २००५ ला आण्णा हजारे यांनी शोधून काढले.माहितीचा अधिकार.त्यातही खूप मोठी टोलवाटोलवी केली जाते.पहिला अर्ज तीस दिवस,दुसरा अर्ज पंचेचाळीस दिवस,तिसरा अर्ज दोन तीन वर्ष माहिती देणे प्रलंबित करू शकतात.जनमाहिती अधिकारी, अपील अधिकारी, माहिती आयुक्त हे पगारी नोकर असल्याने आणि चौर्यविद्याविशारद असल्याने अशी टोलवाटोलवी करणे कठीण काम नाही.शिवाय यांची नाळ मंत्री च्या हाती असल्याने माहिती आधिकाराचे तंत्र फेल करावे लागते. कोणी शहाणा,उत्साही नागरिक भ्रष्टाचार विरोधात पोलीस कडे गेलाच तर फिर्याद घेत नाहीत.म्हणे मंत्री ने भ्रष्टाचार केला तर त्याविरोधात तक्रार करता येत नाही, आम्हाला घेता येत नाही.जळगांव जिल्ह्यातील कोरोना काळातील मंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधातील तक्रार एसपी प्रविण पांडे यांनी ठोकरून लावली.तुम्हाला लिहून देतो कि , आम्ही नाही घेणार.तुम्ही कोर्टात जा.कदाचित युपीएससी ट्रेनिंग मधे हे शिकवले जात असावे.हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे.कलेक्टर अभिजित राऊत यांनी तर भ्रष्टाचार कामी मंत्री गुलाबराव पाटील यांना मदत करून आपला वाटा हिस्सा काढून घेतला होता.हे सर्व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतांना घडले.म्हणजे ठाकरे आणि मोदी जरी राजकीय दृष्टीने टोकाचे विरोधक असले तरी भ्रष्टाचार बाबतीत त्यांचे एकमत आहे.म्हणजे ते राज्यघटनेला अनुसरून असावे.कदाचित त्याच हेतूने दोन्ही राजकारण करीत असावेत. हा भ्रष्टाचार खटला जळगाव जिल्हा कोर्टात नेला तर न्यायाधीशांनी सुद्धा भ्रष्टाचाराला संरक्षण दिले.कदाचित न्यायाधिशांना सुद्धा ट्रेनिंग मधे शिकवले गेले असेल कि, भ्रष्टाचार करणे मंत्री चा घटनात्मक अधिकार आहे. ही कोण माणसे सरकारमान्य चोराला चोर म्हणणारे?कारण हेच गुलाबराव मुख्यमंत्री ठाकरेंचे गळ्यातील ताईत होते.इतका कि,दोघांचा बाप एकच असल्याचे गुलाबराव पाटील आसाम मधे पळून गेले त्या रात्री पर्यंत म्हणत होते.म्हणूनच कदाचित मुख्यमंत्री ठाकरेंनी सरकारी चोराकडे कानाडोळा केला असावा. शिंदे असोत कि गुलाबराव ही माणसे आधीही मंत्री होती.पांचो उंगलिया घी मे,और सर कडाईमे.तरीही का सोडून गेले?का पळून गेले? याचे कारण ही भ्रष्टाचार हेच आहे.आता आदित्य ठाकरे तसे खरे खरे बोलून दाखवत आहेत.म्हणे ,” शिंदे पळून जाण्याआधी मातोश्री वर रडले होते.मी जर भाजप सोबत गेलो नाही तर मला इडी लावून बेडी घालून जेलमध्ये टाकतील.ठाकरे साहेब,माफ करा.”हेच तर कारण होते गुलाबराव सुद्धा ठाकरेंना सोडून पळून गेले. यात ठाकरेंची सुद्धा चुक आहेच. आपला चेला चमचा जर चोरी करीत असेल तर आपण त्याला चोरीपासून रोखले पाहिजे.केंव्हातरी पोलिस,सीआयडी,सीबीआय,इडी वाले आले तर अटक होणारच.आता हिच अवघड अवस्था अजितदादा पवार यांची झालेली आहे.जाये तो जाये कहां?काका कि मोदी? राष्ट्रवादी कि इडी?इकडे आड तिकडे विहीर.अजितदादा जर काकांना सोडून गेले तर त्यात काकांची सुद्धा चूक आहेच.”बेटा,जेवण करायचे पण ताटवाटी खिशात नाही घालायची.” नरेंद्र मोदी म्हणत होते कि,ना खाऊंगा ना खाने दूंगा.पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला कि,ते भ्रष्टाचार करणार नाहीत आणि दुसऱ्याला ही करू देणार नाही.पण मोदींचे म्हणणे वेगळे होते.”उधर रहकर खाने नही दुंगा,इधर आये तो खाने दुंगा.”यातील सत्य समोर आहे.शिंदे आणि गुलाबराव यांनी भाजपाशी घरोबा केला तर यांना आधी जे चोर म्हणत होते,त्यांना आता म्हणतात,” या शिंदेजी,बसा गुलाबरावजी.कशी मी सांभाळू तुमची मर्जी?” आता या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाबत मोदीसाहब को कोई एतराज नही.” भ्रष्टाचार के खिलाफ हम भी बयान करते है,मगर हम उसुलेके गुलाम है !” आघाडी सरकार असताना गुलाबराव देवकर आणि नंतर संजय सावकारे पालकमंत्री होते.तोपर्यंत राष्ट्रवादी च्या नेते,उपनेते, कार्यकर्त्यांच्या उसाला पाणी जात होते.पण आता तब्बल आठ वर्षांपासून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मळा सुकत चालला आहे.ठेकदारी, मक्तेदारी,दुकानदारी,रेतीचोरी वर गाडीचे आणि घरातले इंधन,राशन मिळणे बंद पडले आहे.गुरेढोरे विकून,घरेदारे गहाण ठेवून ठेवून कंगाल झाले.अनेकांचे बगिचे सुकलेत.ज्यांचे गुलाबराव पाटील सोबत संध्याकाळ चे नाते आहे त्यांच्या उसाला ठिबक सिंचन चे पाणी मिळते.ज्यांनी कडवट भुमिका घेतली त्यांचे मळे पार सुकलेत.कोणी दारू,सट्टा,सावकारी ने चुल्हा पेटवतो तेथेही घाला येत आहे.म्हणून कसेतरी जीव मुठीत धरून जगत आहेत.कारण मोदींचे राजकीय तत्वज्ञान आहे.जो हमारा होगा,उसका धंदा आबाद रहेगा.बाजीगर आहेत ते.” तुम अगर मेरे नही हो सकते तो और किसीके नही हो सकते.” आता सर्वच पक्षातील नेते,उपनेते, कार्यकर्ते राजकारण या धंद्यावरच अवलंबून आहेत.ते धंदे सरकार च्या अधीन आहेत.सरकार बदलले कि धंदे बंद पडतात.काहींना जेलमध्ये जाण्याची भीती असते.म्हणून हे राजकीय उद्योजक सरकार पक्षाकडे पळ काढतात.जळगांव महानगरपालिकेचे ५७पैकी तब्बल ३२नगरसेवक भाजप सोडून शिवसेनेत गेले होते.आता पुन्हा शिवसेना आणि भाजप यांचे मेतकूट जमले म्हणून तेच पुन्हा भाजप कडे जात आहेत.कारण राजकारण हाच त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे.या धंद्याला राजाश्रय आवश्यक आहे.जर महाराष्ट्रात पुन्हा आघाडी किंवा महाआघाडी सरकार सत्तेवर आले तर हेच नगरसेवक माकडांसारखे ठाकरे किंवा राष्ट्रवादी कडे जातील.कारण राजकारण हाच त्यांचा पोटापाण्याचा,विकासाचा धंदा आहे.आताच भाजपच्या गटनेत्याने रामेश्वर कॉलनीतील ओपन स्पेस ची मागणी केली तर सर्वच नगरसेवकांनी समर्थन दिले.जरी यात भाजप, ठाकरे शिवसेना , शिंदे शिवसेना , राष्ट्रवादी चे असले तरीही.भ्रष्टाचार व चोरी बाबत सर्वच नगरसेवकांचे एकमत आहे.भ्रष्टाचार व चोरी हाच तर मुख्य उद्देश आहे.”एकच ध्येय.सपाटून काम.चोरी मेरा काम.नगरसेवक मेरा नाम.”…

शिवराम पाटील

मो.९२७०९६३१२२

महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *