ताज्या बातम्या

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राजीव गांधी महाविद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त

मुदखेड – कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेडची विद्यार्थिनी कु. समृद्धी हामंद या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयाच्या वतीने वाद-विवाद, वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच विद्यापीठीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय  स्पर्धेत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते. कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय, उमरी येथे कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा विषय अमृत महोत्सवी भारतीय संविधान असा होता. राजीव गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. समृद्धी हामंद त्या विद्यार्थिनी स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. ए. टी. शिंदे, डॉ. डी.एच. मेहत्रे, डॉ. माधव बसवंते, डॉ. व्ही. सी. ठाकूर, डॉ. राहुल धावारे, प्रा. बालाजी जाधव यांनी तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *