राज्यात आणीबाणी सारखी परिस्थिती नाही, भाजप सरकार अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय
AURANGABAD – आज रविवार 24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे औरंगाबादचे जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आले ते महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सदरील कार्यक्रमाला उपस्थित होते,यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देतांना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की सदरील महामार्ग मी मंत्री असताना मंजूर करून आणला होता ही परिस्थिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना ही माहित आहे. मी मंजूर करून आलेल्या कामांची माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी करून घ्यावी. मात्र डॉक्टर भागवत कराड यांना संबंधित परिस्थिती माहीत नसतानाही, कोणत्याही कामाचा आम्ही मंजूर करून आणले याचा बाऊ करतात. अजून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांना दिल्ली समजलेली नाही दिल्ली समजण्यासाठी त्यांना अजून खूप वेळ घालवावा लागेल असाही टोला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी डॉक्टर भागवत कराड यांना लगावला आहे, राज्यात आणीबाणी सारखी परिस्थिती नसून मात्र भाजप सरकार अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले आहे.