ताज्या बातम्या
रावेर तालुक्यातील गोलवाडे परिसरात बिबट्याचा वावर

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील गोलवाडे गावात बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोलवाडे गावाजवळ रहीवासात असलेल्या सुपळाबाई झेंडू जैतकर यांच्या घराबाहेर बांधलेल्या बकरी ला बिबट्याने फस्त केल्याचं समोर येताच गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाकडे माहिती देताच वनविभागाचे वनपाल रविंद्र सोनवणे व त्यांच्या टिम घटनास्थळी हजर होऊन बिबट्याचे परमार्ग घेतले. वनविभागाकडून परिसरातील ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले . वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.