रावेर भाजपच्या तालुकाध्यक्ष पदासाठी 9 जण इच्छुक

जळगाव उमेश कोळी
रावेर – भारतीय जनता पक्षाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 9 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे कोणाचीही निवड न होता इच्छुकांच्या नावाची यादी वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांकडून घेतला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या रावेर तालुका अध्यक्ष पदासाठी आज मंगलम लॉन येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रदेश सचिव अरूण मुंडे, अजय भोळे, सचिन पानपाटील, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश धनके, लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीससी एस पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यांनी दिल्या मुलाखतीआगामी तालुकाध्यक्ष पदासाठी दुर्गादास पाटील, अजाबराव पाटील, वासूदेव नरवाडे, नितिन पाटील, अरूण शिंदे, प्रमोद पाटील सिंगत, उमेश महाजन, श्रीकांत सरोदे, महेश चौधरी या नऊ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. निवडीसाठी आलेल्या पक्षाच्या वरिष्ठांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले असून इच्छुकांच्या नावाची यादी पुढील प्रक्रियेसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे रावेर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीचा चेंडू वरिष्ठांकडे ढकलन्यात आला आहे.
