ताज्या बातम्या

चोपडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे ज्योती बारेला इच्छुक

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील

चोपडा येथे डॉ.बाबासाहेब जयंती निमित्त आयोजित क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगी आमंत्रित असलेल्या ज्योती बारेला यांनी पत्रकार परिषद घेत सध्या लोकसभेचे वारे वाहत आहे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे रावेर लोकसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार जाहीर करतील त्यांना निवडून देण्या करता संपूर्ण संघटन हे एकजुटीने प्राचार करणार आहे त्यासाठी सोशल मीडिया द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. तसेच मी स्वतः येणाऱ्या चोपडा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा तर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले चोपडा विधानसभा निवडणूक लढण्याकरता आधीच डॉ.चंद्रकांत बारेला हे इच्छुक असताना त्यांचाच भगिणी ज्योती बरेला यांनी आपली दावेदारी पुढे केली आहे .ज्योती बारेला पुढे म्हणाल्या की पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्याचा विचार करूनच उमेदवारी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विषयी सुप्रिया सुळे यांनी मला पुढील वाटचाली साठी आजच शुभेच्छा दिल्या असल्याचे ज्योती बारेला यांनी सांगितले असून आज जरी माझी ओळख डॉ.चंद्रकांत बारेला यांची बहीण म्हणून असली तरी येणाऱ्या काळात ही नक्कीच बदलणार आहे.पक्षाचे तिकीट तर एकालाच मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे प्रतेक इच्छुक उमेदवारांचा अधिकार आहे येणाऱ्या काळात इच्छुक उमेदवारांच्या संख्या वाढत जाणार आहे व तिकीट कोणाला द्यायचे हे पक्ष श्रेष्ठी ठरवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *