राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
नांदेड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड द्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद्र यांचा जन्मदिन व क्रीडा सप्ताह सन 2024-25 निमित्त दि.२९ ऑगस्ट रोजी जिल्हातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात नायगाव तालुक्यातील दोन राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यात सुभाष भिमराव सज्जन (राष्ट्रीय स्तरावर प्रथम) व दत्ता देऊबुवा भारती (राष्ट्रीय स्तरावर प्रथम) यांनी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय अशी कामगीरी केल्याबद्दल व जिल्हयाचे तसेच राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कडून मा.श्री.महेशकुमार डोईफोडे (आयुक्त म.न.पा.नांदेड) व मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व क्रीडा गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी उपस्थित जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावरील असे विविध खेळातील अनेक खेळाडू उपस्थीत होते. या सर्व खेळाडूंना मा.श्री.बालाजी शिरसीकर सर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) व मा.श्री.प्रवीण कोंडेकर (क्रीडा अधिकारी), सौ.देशमुख मॅडम आदि उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.