राष्ट्रीय छात्र सेनेने दिला स्वच्छ भारत, स्वस्थ भारतचा संदेश

धरणगाव प्रतिनिधी:अजय बाविस्कर.
धरणगाव -येथील पी.आर. हायस्कूल द्वारा महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२४ हा उपक्रम १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर दरम्यान राबविण्यात आला.या उपक्रमात डॉ.बापू शिरसाठ यांनी स्वच्छ भारत,स्वस्थ भारत या विषयावर मार्गदर्शन केले. शिवाय स्वच्छतेचा हा विचार घराघरात कसा पोहचावावा याबाबत माहिती दिली.स्वच्छतेची सुरवात माझ्यापासून हा विचार मनात पक्का ठेवून कार्याला सूरुवात करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात घरोघरी जावून स्वच्छतेबाबत जनजागृती केली.परिसरातील कचरा साफ करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.यात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेचे महत्व आणि स्वच्छ भारत अभियानाची गरज या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. छात्र सैनिकांनी स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारीची जाणीव इत्यादी बाबींवर उत्तम प्रकारे उपस्थितांना समजावले यासाठी व्याख्यान, पोस्टर रंगविणे, प्रदर्शन ,मी स्वच्छता दुत बोलतोय असे उपक्रम राबविण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिसरात स्वच्छता राखण्याचा संकल्प केला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.