महाराष्ट्र

राहुरी | कनगर येथे ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या हस्ते झेंडावंदन

प्रतिनिधी | आशिष संसारे

राहुरी तालुक्यातील कनगर ग्रामपंचायतीचे झेंडावंदन जे कुटुंब मार्च अखेर पर्यंतचा थकीत कर भरेल,अशा कुटुंब प्रमुखाची चिट्ठी पद्धतीने निवड करण्याचा निर्णय सरपंच सर्जेराव घाडगे पाटील यांनी दोन वर्षांपासून घेतला असून यावेळी गंगाधर जगन्नाथ गाढे यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली.त्यामूळे त्यांच्या पत्नी सौ.सुनीता गंगाधर गाढे व गंगाधर गाढे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी मारुती मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमात न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले.यावेळी ग्रामपंचायतने वतीने बॉक्सिंग चॅम्पियन जोती बाबासाहेब शेटे, तरुण उद्योजक संकेत घाडगे, आशिष घाडगे, गंगाधर गाढे, सुनीता गाढे यांचा सन्मान केला.
यावेळी सर्जेराव घाडगे, संदीप घाडगे, सुभाष नालकर, आण्णासाहेब घाडगे, गोरक्षनाथ नालकर, दादासाहेब घाडगे, आण्णासाहेब शेटे, दत्तात्रय गाढे ग्रामविकास अधिकारी संभाजीराव निमसे, महंमदभाई इनामदार, अन्सारभाई शेख, दिलीप चांगदेव घाडगे, भाऊसाहेब घाडगे, राजेंद्र दिवे, गोविंदराव दिवे, रंगनाथ घाडगे, मनिषा दिवे, लीलाताई सोंडे, छायाताई दुशिंग, मुख्याध्यापक पेरणे, जाधव गुरुजी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *