राहुरी | ज्येष्ठ पत्रकार निसार भाई सय्यद यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा आर.पी.आय च्या वतीने निषेध

लोकनायक प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी
राहुरी – ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबद आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुका हा शांतता प्रिय तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही धर्मांध शक्ती जातीयतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. रविवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथील ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर काही जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला करून त्यांच्या कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेचा आरपीआय आठवले गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पत्रकार निसार सय्यद यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी. राहुरी तालुक्यात तसेच समाजात शांतता निर्माण करण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. नायब तहसिलदार संध्या दळवी व पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, रॉबर्ट सॅमुअल, शहराध्यक्ष बबन साळवे, राजू साळवे, सागर साळवे, नवीन साळवे, प्रवीण पाळंदे, शेखर पवार, सलिम शेख, सुनील साळवे, अशपाक सय्यद, मयूर सूर्यवंशी,बाळासाहेब म्हस्के, अतुल पवार, सागर पाटील, रितेश पवार, निलेश पवार, दादू साळवे, राजू सय्यद, ऐजाज शेख, महिला तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे, प्रियंका सगळगीळे, सिद्धांत सगळगिळे, सचिन सगळगीळे, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.
