महाराष्ट्र

राहुरी | देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर येथे संसारे परिवाराच्या वतीने नाताळा निमित्त स्नेह मेळावा

प्रतिनिधी | आशिष संसारे, राहुरी

सारेगमप लिटिल चॅम्प महविजेती गौरी पगारे व उपविजेता जयेश खरे यांची प्रमुख उपस्थिती

राहुरी – तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर येथे नाताळ सणानिमित्त पवित्र मिस्सा अर्पण,प्रवचन व स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती गौरी पगारे व उपविजेता जयेश खरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही नाताळ सणाच्यानिमित्ताने आंबी स्टोअर येथे पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात पुणे येथील रेक्टर पेपल सेमिनरी धर्मगुरू फादर भाऊसाहेब संसारे यांचे प्रवचन संपन्न झाले. यावेळी फा.संपत भोसले, फा.मायकल वाघमारे,फादर सेंटो,फा.जेम्स,फा.सायमन शिनगारे,फा.प्रशांत शाहराव
सिस्टर तारा,सि.स्मिता,सि.शैला,सि. जेनसिया,खंडागळे गुरुजी आदी उपस्थित होते.
यावेळी सारेगमप लिटिल चॅम्प महाविजेती गौरी पगारे व उपविजेता जयेश खरे यांना सन्मानित करण्यात आले.गौरी व जयेश यांच्या भारदस्त आवाजातील गीत गायनांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास माजी आ.चंद्रशेखर कदम माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मच्छीन्द्र कदम, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, माजी नगरसेवक अमोल कदम, भारत शेटे, अण्णासाहेब चोथे, बाळासाहेब खुरुद,सचिन ढुस आदीनाथ कराळे, विश्वास पाटील, अनंत कदम, डॉ.संदीप मुसमाडे, व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश वाळुंज, प्रशांत कोठुळे, शशिकांत खाडे, मच्छीन्द्र कराळे, सचिन शेटे, सतीश वने, कॉ.बाळासाहेब सुराडे, कॉ.राजेंद्र बावके, सोसायटी चेअरमन उत्तम मुसमाडे , संचालक सुधीर टिक्कल, सुदाम भांड, राहुरी अर्बन निधीचे रामभाऊ काळे, काँग्रेसचे अजय खिलारी, शांती दीपक त्रिभुवन,उद्योजक किशोर गडाख,प्रकाश सोनी,बाळासाहेब आढाव,मंगेश ढुस,चेतन कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक प्रकाश संसारे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक संसारे, ॲड.शशिकांत संसारे,प्रकाश संसारे, प्राध्यापक विजय संसारे, कॉ. शरद संसारे, रावसाहेब संसारे, सतीश संसारे, विशाल संसारे , अक्षय संसारे, विश्वास संसारे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास हिंदू-मुस्लिम व ख्रिस्ती बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *