राहुरी : पिंपरी निर्मळ येथे दलीत कुटुंबावर ४०० ते ५०० जणांच्या जमावाचा जीवघेणा हल्ला…

राहुरी प्रतिनिधी (आशिष संसारे)
घटनेतील आरोपींवर वाढीव कलमे लावून,कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आर पी आय च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन…
ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे ४०० ते ५०० जणांच्या जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढवला. जमावाने घराची तोडफोड करून जाळपोळ केली. ही घटना बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७१ जणा विरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. हल्ला झालेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस ठाण्यात आश्रय घेतल्याने सदर कुटुंब वाचले. या प्रकरणाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरला आहे.
६ डिसेंबर २०२३ रोजी राहता तालूक्यातील निर्मळ पिंपरी येथे सुमारे ४०० ते ५०० गावगुंडांनी दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरां पैकी काहीजण यांचे मणिपूर करा, असे ओरडत होता. परंतु लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला. अशी माहिती पीडित कुटुंबातील सदस्यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घटने बाबत आरपीआय आठवले गटाच्या वतीने आज जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, राहता तालूक्यातील निर्मळ पिंपरी येथे पूर्व नियोजित कट करून दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी शारदा सुधाकर कोळगे या पीडित महिलेच्या फिर्यादीमध्ये वाढीव व गंभीर स्वरूपाच्या गुणाची कलमे लावून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. पिंपरी निर्मळ तालुका राहता येथील गंभीर स्वरूपाच्या घडलेल्या घटनेत पोलीस प्रशासनाकडून पीडीतीची फिर्याद घेताना गंभीर स्वरूपाच्या कलमाची नोंद घेतली नाही. सदर कुटुंबाला भविष्यात न्याय मिळण्यासाठी व कायदा सक्षम असल्याची जाणीव यासाठी
फिर्याद दाखल होताना ठाणे अंमलदार यांनी जी कलमे फिर्यादीमध्ये नमूद करणे आवश्यक होती. ती कलमे लावली नाही व गरीब व दलित कुटुंबीयांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या पीडित कुटुंबाच्या फिर्यादी यांच्या नुसार पूर्वनियोजित कट करणे, घरात बळजबरीने प्रवेश करणे, अल्पवयीन मुलीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करणे, तिच्याशी गैर कृत्य करणे, तिला अपमानित करणे, जनावरांचा गोठा व गाड्या जाळण्याचा प्रयत्न करणे, घरांमध्ये झुंडीने घुसून घरातील सामानाची मोडतोड करून वस्तू लुटणे अशा घटना घडलेल्या आहेत. या घटनेतील आरोपीवर पोलिसांकडून पोस्को सारख्या कलमाची नोंद फिर्यादीमध्ये न घेणे, सदर कुटुंबावर बहिष्कार टाकणे, लाईट बंद करून दहशत निर्माण करणे, हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून केवळ अनुसूचित घटकातील कुटुंब असल्याने कोणाच्यातरी दबावामुळे या गंभीर गुन्ह्याची नोंद फिर्यादीमध्ये केलेली नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राहुरी तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे, शिरीष गायकवाड, सुनील चांदणे, अप्पासाहेब मकासरे, सागर साळवे, विवेक सगळगिळे, राजू दाभाडे, सुनील साळवे, तुषार दिवे, कुमार भिंगारे, पिडीत कोळगे कुटुंब उपस्थित होते.