महाराष्ट्र

राहुरी | पोलीस हवालदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याची गुहातील एका युवकाची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल ?

राहुरी प्रतिनिधी – आशिष संसारे

नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक ठेंगे याकडे लक्ष घालणार का ?

राहुरी पोलीस स्टेशन मधील नेहमीच वादग्रस्त ठरत असलेला एक पोलिस कर्मचारी वेळोवेळी पैशाची मागणी करून मानसिक त्रास देत असल्या कारणाने या त्रासाला कंटाळून गुहा येथील एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याची पोस्ट त्याच्या व्हॉट्स ॲप वरून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची या अगोदरही गुहा गावातील अनेक ग्रामस्थांनी विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासमोर मोर्चाद्वारे कैफियत मांडलेली असून या कारणाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची राहुरी फॅक्टरी बीट वरून वांबोरी बीटला बदली केलेली असतानाही हा पोलीस कर्मचारी वेळोवेळी राहुरी फॅक्टरी,गुहा,गणेगाव आदी गावातील सर्वसामान्य नागरिक छोटे-मोठे व्यवसायिक टपरीधारक यांना नेहमीच आर्थिक फायद्यासाठी त्रास देत असून या पोलीस कर्मचाऱ्याची वेळोवेळी व्यापारी संघटना व नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही हा निर्धावलेला पोलीस वर्दीतील गुन्हेगार कर्मचारी राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून संबंधित कर्मचाऱ्याचे यापूर्वीचे अनेक प्रकार लोकनायक न्यूज च्या हाती आलेले असून राहुरी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक ठेंगे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *