महाराष्ट्र
राहुरी फॅक्टरीत व्यापारी संघटनेची स्थापना…

अध्यक्षपदी आदिनाथ कराळे उपाध्यक्षपदी जयेश मुसमाडे तर कार्याध्यक्षपदी प्रशांत काळे यांची निवड…
प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथील सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे व्यापारी संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी आदिनाथ कराळे यांची उपाध्यक्षपदी जयेश मुसमाडे तर कार्याध्यक्षपदी प्रशांत काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे शनिवार ४ ऑक्टोबर रोजी शेकडो व्यापाऱ्यांचा उपस्थित पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राहुरी फॅक्टरी येथील छोटे-मोठे व्यापारी यांच्या अडचणी, बंदबाबत विचारविनिमय, मासिक बैठक, अन्याय झालेल्या दुकानदाराला मदत याबाबतीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी कराळे उपाध्यक्षपदी मुसमाडे कार्याध्यक्षपदी काळे तर सल्लागारपदी ऋषी राऊत, सचिवपदी वैभव गाडे, खजिनदार विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रत्येक क्षेत्रातील दुकानदार चालक व विक्रेते यांची एक कमिटी निर्माण करण्यात आली आहे.
प्रसंगी राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व व्यापारी बांधव या ठिकाणी उपस्थित होते.