ताज्या बातम्या

राहुरी फॅक्टरी परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू

राहुरी प्रतिनिधी | आशिष संसारे

राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील हॉटेल ताईसाहेबसमोर चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तिचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहन एम एच .१५ एफ व्ही. ३३५० ने दुचाकिस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूने उडला गेला. याचवेळी शिर्डी रस्त्यावर ऊस तोडणी कामगार घेऊन जात असलेल्या वाहनाखाली तो सापडला गेल्याने जागीच ठार झाला. शंकर साहेबराव खपके वय ५५ वर्षे असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते गुहा येथील रहिवासी आहेत.दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशिदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *