राहुरी फॅक्टरी येथे भीमतेज मित्र मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा
प्रतिनिधी – आशिष संसारे
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे भीम तेज मित्र मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपकभाऊ त्रिभुवन, उत्तम पंडित (आण्णा) यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष विक्रांत भाऊ पंडित, आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, सामाजिक कार्यकर्ते अतुल त्रिभुवन, दत्ता साळुंके, सुनील विश्वासराव, प्रवीण पाळंदे, संदीप बागुल, अजिंक्य कराळे, प्रकाश सांगळे, दीपक सांगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष नेल्सन कदम तसेच पत्रकार आशिष संसारे प्रयत्नशील होते.