राहुरी | माऊली वृद्धाश्रमास साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आर्थिक मदत
वृद्धांना आर्थिक आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी
प्रतिनिधी – आशिष संसारे
वृद्धपकाळामध्ये वृद्धांना आर्थिक आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे विशेषता जे वृद्ध वृद्धाश्रमामध्ये राहतात त्यांची विशेष काळजी घेणे साठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे त्यांना हा आधार आपल्या भावी आयुष्यासाठी सुख देऊन जाणारा असल्याचे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने माऊली वृद्धाश्रम श्रीरामपूरचे सुभाष वाघुंडे यांचेकडे आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्या शुभहस्ते सदर धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी दारीआप्पा आंधळकर, सद्दाम शेख,अरबाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की, वृद्धपकाळामध्ये वृद्धांना जपण्याची सामाजिक बांधिलकी आपली आहे त्यांना आपण आधार दिला तर त्यांचे आयुष्यमान नक्कीच वाढून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हे कोणत्याही पैशापेक्षा मोलाचे आहे. ही सामाजिक जबाबदारी जपण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. विशेषता वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या वृद्धांना आर्थिक मदतीची मोठी गरज भासते त्यातून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होते. म्हणूनच शक्य त्या सर्वांनीच या वृद्ध आश्रमांना मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन कपाळे यांनी यावेळी केले.