रेणाखळीची पुनम इंगळे एन.एम.एम.एस.परिक्षेत जिल्ह्यात पहीली !

पाथरी प्रतिनिधी / उद्धव इंगळे
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रेणाखळी पिएमश्री जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु.पुनम उध्दव इंगळे ही एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत मुलींमधून परभणी जिल्ह्यातून पहिली आली असून सर्व साधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात तिसरी आली असुन शाळेचे तिच्यासह पाच विद्यार्थी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती पात्र ठरले आहे.
सदरील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील असल्याने शाळे व्यतिरिक्त कसलेही क्लास, शिकवणी न लावता शिक्षकांनी शाळेतच घेतलेल्या विशेष परिश्रमातुन सदरील यश संपादन केले.पुनम ही नवराष्ट्र पत्रकार तथा माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव इंगळे यांची मुलगी आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांना मार्गदर्शन करणारे विकास मामीलवाड सर, चारुदत्त भामरे, संतोष बाबळे, वर्ग शिक्षक वैजीनाथ गिरी सर, अन्वर सर, तुरे सर व गजमल मॅडम, गाढवे सर कांबळे सर साबळे मॅडम व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर हारकळ मुख्याध्यापक तांबोळी सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले या सर्वांचे पालकवर्गा कडुन अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून रेणाखळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरत असून प्रत्येक वर्षी येथील विद्यार्थी सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.