रेशन कार्ड साठी स्वीकारली लाच ; लाच लुचपत विभागाने घेतले पुरवठा विभागाच्या लिपिकास ताब्यात
जळगाव – बोदवड तालुक्यातील एका तक्रारदाराकडून १ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा विभागाच्या लिपिकास जाळ्यात ओढल्याची घटना नुकतीच समोर येत आहे.
उमेश बळीराम दाते, वय ५५ वर्ष या बोदवड पुरवठा विभागातील लिपिकाने १ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना जळगावच्या लाच लुचपत विभागाने आज मंगळावर रोजी अटक केली आहे.
तक्रारदार यांचेकडे रेशन कार्ड वर आई चे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी तसेच नविन रेशन कार्ड तयार करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडेस १ हजार रुपयाची मागणी करून उमेश दाते याने बोदवड तहसिल कार्यालय येथे स्वतः स्विकारतांना त्यांस जळगाव च्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याचे वर बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, स.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ.सचिन चाटे यांच्या पथकाने केली आहे.
पथकास नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलिस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
लाच लुचपत विभागाचे आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8806643000
@ टोल फ्रि क्रं. 1064